बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!

 

बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!



भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. कोरोनाची भीती पाहता खेळाडूंना संक्रमक होऊ नये म्हणून त्यांना बायो बबलमध्ये ठेवले जाते. भारतीय संघातील खेळाडू युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेपासून बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे संघातील खेळाडूंची मैत्री घट्ट झाली आहे. अशातच कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मैत्रीला देखील नवीन सुरुवात मिळाली आहे.


वादावर पडदा पडल्याची चिन्हे गेले काही महिने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याची चर्चा जोर धरत होती. आयपीएलमध्ये रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र आयपीएलच्या अंतिम सामन्यात रोहितने भाग घेतल्याने या दुखापतीच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातच कोहलीला याबाबत विचारले असता रोहितच्या दुखापतीबद्दल पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे या वादाला अधिकच तोंड फुटले होते.


त्यातच रोहित शर्माची आयपीएलमधील कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी पाहता त्याला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व द्यावे, ही मागणीही जोर धरत होती. याच सगळ्या कारणांमुळे रोहित आणि विराट यांच्यात सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट मालिकेत दिसलेल्या बॉन्डिंगने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बायो बबलमुळे असे झाले बदल माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाने या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या २ बलाढ्य संघाविरुद्ध मालिका खेळली आहे. या मालिकेदरम्यान संघातील खेळाडू बायो बबलमध्ये होते. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. या दोन्ही खेळाडूंनी आपला खेळ, आपला संघ, आपली जबाबदारी आणि येणाऱ्या आव्हांनाचा आधीपेक्षा जास्त सहमत होऊन सामना केला आहे. त्यांना हे कळाले आहे की, त्यांच्या एकमत राहण्याने संघाला फायदाच होणार आहे. गेल्या काही महिन्यातील हे सर्वात मोठे यश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ते आता सार्वजनिकरित्या एकमेकांसोबत बोलताना दिसून येत आहेत. जसे की टी-२० मालिका संपल्यानंतर सादरीकरणाच्या वेळी ते आधीपेक्षा जास्त फोटोज् क्लिक करताना दिसून येत आहेत. तसेच एकमेकांसोबत गप्पा मारताना देखील दिसून येत आहेत. अशा गोष्टी या आधीसुद्धा घडल्या असतील. परंतु या वेळेस त्यांच्यातील मैत्री सर्वांच्या जास्त निरिक्षणात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या