IPL 2021 Schedule 

जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० लीग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने रविवारी आयपीएलच्या १४व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले.

आयपीएल

हायलाइट्स:

  • आयपीएलच्या १४व्या हंगामाची सुरूवात ९ एप्रिल रोजी, अंतिम लढत ३० मे रोजी होणार
  • पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार
  • कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही
मुंबई: IPL 2021 Schedule आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने रविवारी १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केली. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. जवळ जवळ दोन वर्षांनी आयपीएल भारतात होत आहे. या हंगामाचे सर्व सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत.